बाबा सिद्दिकी हत्याकांड, अकोल्यातून आणखी एकाला अटक

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांड प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आणखी एकाला अटक केली. सुमित वाघ (26) असे त्याचे नाव असून तो अकोला येथील पानज गावचा रहिवासी आहे.

सुमित वाघ याने गुजरातमधील कर्नाटक बँकेच्या शाखेतील खात्यातून आरोपींना पैसे पाठवले होते. सुमितने इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पैसे पाठवले होते. याकरिता त्याने अटक आरोपी सलमान वोरा यांच्या नावे घेतलेल्या सीमकार्डचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुह्यातील पाहिजे आरोपी शुभम लोणकर याच्या सांगण्यावरून सुमितने अन्य आरोपींना पैसे पुरवले होते. सुमित आणि शुभम हो दोघे चांगले मित्र असून दोघेही अकोला शहरातील एकाच महाविद्यालयात शिकले होते.