![mahakumbh (1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mahakumbh-1-1-696x447.jpg)
उत्तर प्रेदशातील प्रयागराजमध्ये संध्या महाकुंभ मेळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक महाकुंभसाठी सहभागी होत आहेत. अनेक साधू बाबांनी देखील हजेरी लावली आहे. महाकुंभमध्ये येऊन अनेक साधू बाबांनी भाविकांना चमत्कार दाखवले. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये बाबांनी मंत्रांचा वापर करून अस्वच्छ पाण्याचे शुद्धीकरण करून स्वच्छ पाणी बनवले आहे. बाबांची ही जादू पाहून भाविकही हैराण झाले आहेत.
महाकुंभात अस्वच्छ पाणी स्वच्छ करणाऱ्या एका बाबाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये बाबांनी एका भांड्यात अस्वच्छ पाणी घेतले. यानंतर बराच वेळ ते त्या पाण्यात मंत्र जाप करत होते. यानंतर काही वेळातच त्या अस्वच्छ पाण्याचे स्वच्छ पाण्यात रुपांतर झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. बाबांचा चमत्कार पाहून तेथे उपस्थित भाविकही भारावून गेले. मात्र काहींनी बाबांची चालाकी ओळखली.
बाबांनी मनातल्या मनात मंत्रांचा जप करताना ज्या पद्धतीने पाण्यात हात हलवला त्यावरून हा एका रासायनिक प्रक्रियेचा परिणाम असल्याचे लोकांना समजले. सदर व्हिडिओ द सोशल जंक्शन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. .यावर अनेकांनी मिश्कील प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने बाबा मी हे 11 वीत असताना वाचले होते, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या युजरने या बाबांना दिल्लीला पाठवा, यमुना स्वच्छ करण्यासाठी त्यांची मदत होईल, अशी कमेंट केली आहे.