आधी प्रायव्हेट पार्ट दाखव तरच…; अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काउचचा भयंकर किस्सा

बॉलिवूडसारख्या मोठ्या चित्रपट क्षेत्रात प्रवेश करून आपली वेगळी ओळख निर्माण करणे सगळ्यांनाच जमत नाही. एखादा नवा कलाकार जेव्हा इंडस्ट्रीत काम करण्यासाठी जातो, तेव्हा त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. यापैकी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे बॉलिवूडचे कास्टिंग काउच. बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे कास्टिंग काउचची प्रकरणं  आपण ऐकली असतील. या कास्टिंग काउचचा एका अभिनेत्यालाही सामना कारावा लागला होता. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आयुष्मान खुराना आहे. आयुष्माने एका मुलाखतीत त्याच्या बॉलीवूड करिअरवर अनेक खुलासे केले आहेत.

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना याने नुकतीच हिंदुस्तान टाइम्स या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने केलेल्या संघर्षाची माहिती दिली. तसेच त्याने बॉलिवूडमधील कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला. मी एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेलो होतो. त्यावेळी एका कास्टिंग डायरेक्टरने मला सांगितले की, जर मी त्याला माझा प्रायव्हेट पार्ट दाखवला तरच तो मला चित्रपटात मुख्य भूमिका देईल. मात्र त्यावेळी मी ती परिस्थिती शांतते हाताळली. त्या डिरेक्टरला मी सरळ सांगितले मी एक सरळ व्यक्ती आहे. त्यामुळे मी ही ऑफर स्वीकारू शकत नाही, असे म्हणत आयुष्मानने आपली सुटका केली होती.

पुढे तो म्हणाला की, आधी जेव्हा मी ऑडिशनसाठी जायचो तेव्हा तिथे सोलो टेस्ट घेतली जायची. त्यावेळी अचानक तेथे ऑडिशन्सला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली. एकाच खोलीत 50 लोक जमा झाले. मी या सगळ्याला विरोध केला होता. मात्र तेव्हा मला तिथून हाकलून लावले. त्यामुळे मी नकारही सहन केला. अनेक वेळा मला तुझ्या भुवया खूप मोठ्या असल्याचे सांगून नाकारण्यात आले, असे त्याने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मान याआधी ‘विकी डोनर’, ‘दम लगा के हईशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’, ड्रीम गर्ल, ड्रीम गर्ल 2 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. याशिवाय त्याचे ‘गुगली’ आणि ‘छोटी सी बात’ हे बहुचर्चित चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत.