![Untitled design (17)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-17-696x447.jpg)
अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे आज वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्येंद्र दास यांना 3 फेब्रुवारी रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात आणण्यात आले होते.