अयोध्येत 11 जानेवारीपासून वार्षिक उत्सव

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त 11 ते 13 जानेवारी असे तीन दिवसीय भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ या वर्षी 22 जानेवारीला झाला होता, परंतु प्राणप्रतिष्ठा पौष शुक्ल द्वादशी 22 जानेवारी 2024 ला होती. परंतु, 2024 मध्ये ही तिथी 11 जानेवारीला येत आहे. त्यामुळे त्या दिवसापासून राम मंदिर ट्रस्ट तीन दिवसीय धार्मिक अनुष्ठान आयोजित करत आहे, असे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी म्हटले आहे.

सर्व हिंदू सण हे विशिष्ट तिथीनुसार साजरे केले जातात. त्यामुळे रामलल्लाच्या प्रतिष्ठsचा वर्धापनसुद्धा तिथीनुसार साजरा केला जाणार आहे. राम नवमी, कृष्ण जन्माष्टमी, विवाह पंचमी यासारखे सण हिंदू कॅलेंडरनुसार साजरे केले जातात. त्यामुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठsचे पहिले वर्षसुद्धा प्रतिष्ठा द्वादशीच्या रूपात साजरे केले जाईल. 11 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी रामलल्ला यांचे अभिषेक आणि भव्य आरती केली जाणार आहे. राम मंदिर परिसरात यज्ञ मंडप टाकला जाणार आहे.