
एकीकडे महाकुंभासाठी महासागर उसळला आहे तर अयोध्येतही रामलल्लाच्या दर्शनासाठी प्रचंड मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोज सुमारे 3 लाखांहून अधिक भाविक अयोध्येत येत असून अयोध्येतील श्रीराम मंदिर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत मंदिर बनले आहे. या मंदिराला एका वर्षात तब्बल 700 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. दानधर्मात आंध्र प्रदेशातील तिरुपती वेंकटेश्वर मंदिर देशात पहिल्या क्रमांकावर आहे. या मंदिरात दरवर्षी 1500 ते 1650 कोटी रुपयांचे दान, देणग्या दिल्या जातात. तर दुसऱ्या क्रमांकावर केरळचे पद्मनाभस्वामी मंदिर आहे.