
अॅक्सिस बँक 100 हून अधिक वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. बँकेने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यास सांगितले आहे. ही नोकर कपात बँकेच्या नियमित प्रोसेसचा एक भाग आहे, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. सध्या बँकिंग इंडस्ट्रीला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या मार्च तिमाहीत बँकेने गेल्या वर्षीच्या 7130 कोटी रुपयांच्या तुलनेत 7117 कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली आहे. व्याजदरांतून बँकेची केवळ 6 टक्के वाढ झाली आहे.