बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरनेच केले साडे 12 कोटी लंपास

बँकिंग प्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारे प्रकरण बंगळुरूमधून समोर आले आहे. एका बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरने आपल्याच बँकेतील 12.51 कोटी रुपये लांबवले. 17 दिवस, 37 ट्रान्झॅक्शन करून त्याने हा गेम केला आणि ड्रीम प्लग पे टेक सॉल्यूशंस प्राइव्हेट लिमिटेड (सीआरईडी) या कंपनीची रक्कम  वळवली. कंपनीने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. त्यात  ऑक्सिस बँकेचा रिलेशनशिप मॅनेजरच आरोपी निघाला. त्याच्यासह या प्रकरणात चार जणांना बंगळुरू पोलिसांनी अटक केली.

राजकोटमधील ऑक्सिस बँकेत वैभव पिथादिया रिलेशिनशिप मॅनेजर होता. तो नियमित बँकेत जात होता. बँकेतील कर्मचाऱ्यांसोबत त्याने चांगले संबंध तयार केले होते. त्याने ड्रीम प्लग पे टेक सॉल्यूशंस प्राइव्हेट लिमिटेड कंपनीच्या करंट खात्यातील 12.51 कोटी रुपये लांबवले. पोलिसांनी एक्सेस बँकेतील अपहाराचा तपास सुरू केला. तेव्हा त्यात वैभव पिथादियाचे नाव समोर आले.