वैद्य खडीवाले संस्थेतर्फे मनीष जोशी यांना पुरस्कार

पुणे येथील प्रसिद्ध वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेचा ‘वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे कार्यकर्ता’ पुरस्कार नाशिक येथील वैद्य मनीष जोशी यांना जाहीर झाला आहे. पुण्यातील एरंडवणा येथील पटवर्धन बागेजवळील धन्वंतरी सभागृहात 16 फेब्रुवारी, 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता होणाऱया कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप 21 हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. वैद्य मनीष जोशी मागील 24 वर्षांपासून अधिक काळ नाशिक येथे आयुर्वेद आणि पंचकर्म प्रॅक्टिस करीत आहेत. यापूर्वी 2007 मध्ये त्यांना मुंबई येथील ‘पंचकर्म अश्विनौ पुरस्कार’ तसेच त्यांच्या पंचकर्मविषयक निबंधाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाला आहे. ‘आपले सण आणि आयुर्वेद’ तसेच ‘आरोग्यम्’ ही त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या ‘निमा’ या राष्ट्रीय संघटनेच्या केंद्रीय शाखेत ते ‘वेब कन्व्हेनर’ म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.