हिमस्खलनात चार मजूर ठार; पाच बेपत्ता

उत्तराखंडच्या चमोली जिह्यातील माना गावात हिमस्खलनामुळे अडकलेल्या एकूण 50 कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यापैकी चार कामगारांचा आज मृत्यू झाला तर अद्याप पाच जणांचा शोध सुरू आहे. लष्कराचे तीन, वायुसेनेचे दोन आणि लष्कराने भाडय़ाने घेतलेले एक हेलिकॉप्टर यासह सहा हेलिकॉप्टर बचाव कार्यात गुंतले आहेत. शुक्रवारी सकाळी हिमस्खलन होऊन त्यामध्ये सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) 55 मजूर आणि आठ पंटेनर अडकले होते. रात्रीपर्यंत 33 कामगारांची सुटका करण्यात आली होती.

दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडच्या सुकमा जिह्यात सुरक्षा दलांनी एक महिला आणि एका पुरुष नक्षलवाद्याला कंठस्नान घातले. दोघांचेही मृतदेह सापडले असून अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. शनिवारी सकाळपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या म्होरक्यांमध्ये चकमक सुरू होती. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता. सुमारे 500 जवानांनी किस्ताराम परिसरात नक्षलवाद्यांना घेराव घातला होता.