Automobile Year Ender: ‘या’ आहेत 2024 मध्ये लॉन्च झालेल्या टॉप 10 कार्स, पाहा लिस्ट

वर्ष 2024 संपायला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. हे वर्ष कार मार्केटसाठी खूप खास राहील आहे. यावर्षी अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या जबरदस्त कार्स लॉन्च केल्या. मात्र आपण यावर्षी लॉन्च झालेल्या टॉप 10 कार्सबद्दल जाणून घेणार आहोत…

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट

Hyundai Motor India ने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Creta चा Facelift मॉडेल लॉन्च केला. यामध्ये कंपनीने अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. Creta ची सध्याची एक्स-शोरूम किंमत 11 लाख ते 20.30 लाख रुपये आहे. तर क्रेटा एन लाइनची एक्स-शोरूम किंमत 16.82 लाख ते 20.45 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी डिझायर

मारुती सुझुकीने या वर्षी आपली सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडान डिझायरचे नवीन मॉडेल लॉन्च केले. ज्याची एक्स-शोरूम किंमत 6.79 लाख ते 10.14 लाख रुपये आहे.

महिंद्रा XEV 9e आणि BE6

महिंद्रा अँड महिंद्राने या वर्षी हिंदुस्थानी बाजारपेठेत दोन नवीन इलेक्ट्रिक कार XEV आणि BE6 लॉन्च केल्या. यातच XEV 9E ची एक्स-शोरूम किंमत 21.90 लाख रुपये आहे आणि BE6 ची एक्स-शोरूम किंमत आहे. 18.90 लाख रुपये आहे.

टाटा नेक्सॉन सीएनजी

देशात सीएनजी कोर्सला मोठी मागणी आहे. हेच लक्षात घेऊन Tata Motors ने यावर्षी हिंदुस्थानी बाजारपेठेत Nexon iCNG लॉन्च केली. याची एक्स-शोरूम किंमत 9 लाख ते 14.60 लाख रुपये आहे.

ऑल न्यू होंडा अमेझ

Honda Cars India ने अलीकडेच आपली लोकप्रिय सब-4 मीटर कॉम्पॅक्ट सेडान Amaze चे नवीन जनरेशन मॉडेल लॉन्च केले होते. ज्याची एक्स-शोरूम किंमत 8 लाख ते 10.90 लाख रुपये आहे.

नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती सुझुकीने या वर्षी आपल्या लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्टचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले. याची सध्याची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख ते 9.59 लाख रुपये आहे.

एमजी विंडसर ईव्ही

JSW MG Motor India ने या वर्षी आपली इंटेलिजेंट इलेक्ट्रिक SUV Windsor EV लॉन्च केली. ज्याची एक्स-शोरूम किंमत 13.50 लाख ते 15.50 लाख रुपये आहे.

Skoda Kylaq

Skoda Auto India ने आपली पहिली सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV Kylaq या वर्षी नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानी बाजारात लॉन्च केली. याची एक्स-शोरूम किंमत 7.89 लाख ते 14.40 लाख रुपये आहे.

Tata Curve आणि Curve EV

Tata Motors ने यावर्षी देशात आपली पहिली SUV coupe Curve लॉन्च केली. ज्यात इलेक्ट्रिक मॉडेल Curve EV देखील आहे. Tata Curve ची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 19 लाखांपर्यंत जाते. तर Curve EV ची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख ते 21.99 लाखा रुपये आहे.

किया सॉनेट फेसलिफ्ट

Kia India ने यावर्षी हिंदुस्थानी बाजारपेठेत सर्वात जास्त विक्री होणारी SUV Sonet चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले. याची सध्याची एक्स-शोरूम किंमत 8 लाख ते 15.77 लाख रुपये आहे.