मोदींच्या लाडक्या बालेश धनखड याला ऑस्ट्रेलियात 40 वर्षांचा तुरुंगवास, भाजप नेत्याचा पाच कोरियन महिलांवर बलात्कार

हरयाणाचा मूळ रहिवासी असणारा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाडका बालेश धनखड याला पाच कोरियन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियातील सिडनी न्यायालयाने 40 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. धनखड हा ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपाचा अध्यक्ष होता. 2023 मध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्याने महिलांना फसवले. त्याच्यावर बलात्काराचे 13 गुन्हे दाखल करण्यात आले होते. बालेश धनखडची कृत्ये पूर्वनियोजित आहेत. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील हा सर्वांत धोकादायक बलात्कारी आहे, असे निरीक्षण न्यायालयाने निकाल देताना नोंदवले.

  • बालेश हा मे 2014 मध्ये मोदींच्या शपथविधीसाठी हिंदुस्थानात आला होता. नोव्हेंबर 2014 मध्ये मोदी ऑस्ट्रेलिया दौऱयावर असताना कार्यक्रमात तो सहभागी झाला होता.