हिंदुस्थानी ‘अ’ संघाचा दोन्ही अनौपचारिक कसोटीत पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियन अ संघाचा कर्णधार नॅथन मॅकस्विनीला ऑस्ट्रेलियन संघाच्या कसोटी क्रिकेटचे द्वार उघडले आहेत. आगामी बॉर्डर-गावसकर करंडकच्या हिंदुस्थानविरुद्धच्या पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या 13 सदस्यीय संघात मॅकस्विनीला डेव्हिड वॉर्नरच्या जागी सलामीला उतरण्याची संधी दिली जाणार आहे. तो उस्मान ख्वाजासह सलामीला उतरेल. याचबरोबर स्कॉट बोलँड आणि जोश इंग्लिस यांना संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.
मार्कस हॅरिस, सॅम कोन्टास यांची नावेदेखील सलामीवीराच्या भूमिकेसाठी चर्चेत होती. मात्र, जॉर्ज बेली यांच्या नेतृत्वातील संघ निवड समितीने मॅकस्वीनीच्या नावावर शिक्कामोर्तब केले. हिंदुस्थान ‘अ’ संघाविरुद्धच्या लढतीत मॅकस्वीनीला 14 आणि 25 अशा धावा करता आल्या. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमधल्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्याच्या नावाला पसंती देण्यात आली.
ह ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ ः पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, ट्रविस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मिचेल मार्श, अलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, स्कॉट बोलॅण्ड, नाथन लायन