
ऑस्ट्रेलियाने टेलिग्रामवर तब्बल 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड ठोठावला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऑनलाईन सेफ्टी रेग्युलेटरने सोमवारी मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर कारवाई करत हा दंड ठोठावला आहे. कंपनीने बाल लैंगिक आणि हिंसक घटनेला खतपाणी घालणारा कंटेट रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या कारवाईनंतर कंपनीने अद्याप या कारवाईवर मौन बाळगले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने ऑक्टोबर मध्ये टेलिग्रामवरील दहशतवाद, हिंसक कंटेट, बाल शोषण संबंधित कंटेट रोखण्यासाठी कोणते पाऊल उचलले आहे, अशी विचारणा केली होती. परंतु, कंपनीकडून कोणतेही उत्तर न आल्याने ऑस्ट्रेलिया सरकारने ही कारवाई केलीय.