गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडवर 5 विकेट्सनी विजय मिळवला आणि इंग्लंडच्या संघाच्या जिवात जीव आला. स्कॉटलंडच्या पराभवामुळे इंग्लंडला टी20 वर्ल्डकपच्या ‘सुपर-8’ फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. ‘ग्रुप-बी’ मधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने ‘सुपर-8’चे तिकीट मिळवले आहे.
स्कॉटलंडने विजयासाठी दिलेलेय 181 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 186 धावा करत पूर्ण केले. टीम डेव्हिडने षटकार खेचत ऑस्ट्रेलिया विजयावर आणि इंग्लंडच्या ‘सुपर-8’मधील प्रवेशावर शिक्कामोर्तब केला. ट्रॅव्हिस हेड याने 49 चेंडूत 68 आणि मार्कस स्टॉयनिसने 29 चेंडूत 59 धावांती आतषी खेळी करत संघाला विजयाचे दार उघडून दिले.
Australia finish Group B unbeaten and knock Scotland out of the #T20WorldCup after a tense clash in St Lucia 😮
📝 #AUSvSCO: https://t.co/p84gm73bKM pic.twitter.com/nLw4P5buHA
— ICC (@ICC) June 16, 2024
तत्पूर्वी करो या मरो लढतील स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. स्कॉटलंडने निर्धारित षटकांमध्ये 5 बाद 180 धावा उभारल्या. ब्रँडन मॅकमुलन याने 34 चेंडूत 6 धावा केल्या. यात त्याच्या 2 चौकारांचाआणि 6 षटकारांचा समावेश आहे. त्याला बेरिंग्टन याने 42 आणि मुन्से याने 35 धावा काढत चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर एश्टन एगर, नाथन एलिस आणि एडम झंपा यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.
सुपर-8 चे संघ
दरम्यान, ‘ग्रुप -ए’मधून हिंदुस्थान आणि अमेरिका, ‘ग्रुप-बी’मधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, ‘ग्रुप-सी’मधून दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज, ‘ग्रुप-डी’मधून अफगाणिस्तान संघ ‘सुपर-8’ साठी पात्र ठरले आहेत, तर एका स्थानासाठी नेदरलँड आणि बांगलादेशमध्ये चूरस आहे. यंदाच्या वर्ल्डकपमधून पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड यासारख्या दिग्गज संघांना साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला.