मराठ्यांचा पराक्रम जागता ठेवणारी प्रतीके नेस्तनाबूत करून चालणार नाही – राज ठाकरे

‘औरंगजेबाला महाराष्ट्रात रुजलेला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता, म्हणून तो महाराष्ट्रात त्यांच्या मृत्यूनंतर तळ ठोकून होता. परंतु, मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला. मराठ्यांचा पराक्रम जागता ठेवणारी ही प्रतीके नेस्तनाबूत करून चालणार नाही. उलट लहान मुलांच्या सहली तिथे नेऊन आपण कुणाला गाडले हे अभिमानाने दाखवायला हवे’, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात ते बोलत होते.

अदानी हुशार, आपण अडाणी

वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या नावाखाली मुंबईतील जागा अदानीला आंदण दिल्या जात आहेत. या सगळ्यात अदानी हुशार निघाला. आम्ही अडाणी निघालो, अशी टिप्पण्णी त्यांनी केली.