
ऑडी कंपनीने आपली नवीन आरएस क्यू 8 परफॉर्मन्स एसयूव्ही हिंदुस्थानात लाँच केली. या कारची किंमत 2.49 कोटी रुपये आहे. या कारची बुकिंग लाँचिंगआधी म्हणजेच या महिन्याच्या सुरुवातीला सुरू करण्यात आली होती. लवकरच याची डिलिवरी सुरू करण्यात येईल. या कारमध्ये नवीन बंपर, व्हील्स, हेडलाईट्ससारखे अपग्रेड्स मिळतील. यात नवीन कलर स्कीम्स आणि इन्पह्टेनमेंट सिस्टमचे अपडेट देण्यात आले आहे.