अतुल सुभाष प्रकरण : पत्नी निकीतासह तीन जणांना अटक

बंगळुरू येथील अतुल सुभाष या 34 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नी निकीत सिंघानियासह तिची आई व भावाला अटक केली आहे. निकीताला हरयाणातील गुरुग्राम येथून अटक केली आहे. तर तिची आई निशा सिंघानिया व तिचा भाऊ अनुराग सिंघानिया यांना प्रयागराजमधून अटक केली आहे. या तिघांनाही न्ययालयात हजर करण्यात आले असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

बंगळुरूमधील ऑटोमोबाइल कंपनीत काम करणाऱ्या 34 वर्षीय अतुल सुभाष या तरुणाने पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून सोमवारी (9 डिसेंबर) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 81 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून 24 पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने 9 तक्रार दाखल केल्या होत्या.