अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पोलिसांची कारवाई, पत्नीसह तिघांना अटक

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणावर कारवाई करत पोलिसांनी अतुल सुभाषची पत्नी निकिता संघानिया हिला गुरुग्राममधून अटक केली आहे. याशिवाय निकिताची आई आणि भावाला अलाहाबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेनंतर तिघांनाही बेंगळुरू न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितनुसार, अतुल सुभाषच्या मृत्यूनंतर निकिताची आई निशा आणि भाऊ अनुराग फरार होते. निकिता हरियाणातील गुरुग्राममध्ये होती. अशातच पोलिसांनी निकिताला गुरुग्राममधून आणि तिचा, भाऊ, आईला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक केली. न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काय आहेत आरोप?

निकिता, तिची आई आणि भावावर 3 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे. अतुल मृत्यूपूर्वी एका व्हिडिओत म्हंटलं होतं की, निकिताने केस मागे घेण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. मुलाला भेटण्यासाठी अतुलकडे 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पत्नी आणि तिच्या घरातील लोकांच्या त्रासाला कंटाळून अतुलने जीवन संपवलं. दरम्यान याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहे.