पुण्यात तरुणीला मारले, राज्यात हे सगळीकडेच घडतेय – पंकजा मुंडे

पुण्यात शुक्रवारी एक वाईट घटना घडली. एका तरुणीला ठार मारण्यात आले. हे सगळीकडेच घडत आहे. पुण्यात काय? नागपूरची घटना काय? राज्यात सगळीकडे अशा घटना घडत आहेत. यावर मी काय बोलू. मुख्यमंत्री भूमिका मांडत आहेत, असे सांगत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री पर्यायाने गृह खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाच घरचा आहेर दिला.

कुठलीही घटना होते भांडण, अथवा खून ज्यांना राजकारण करायचे आहे त्यासाठी ही संधी आहे, असा टोला पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांना लगावला. धनंजय मुंडे यांच्या  राजीनाम्याबाबत यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यावर मी कॉऊंटर करणार नाही. त्यांचं जर म्हणताय शोध लागेपर्यंत कारवाई करणार नाही. ते जर असं  म्हणत आहेत त्यावर मी रोज काय बोलू? एसआयटीची पहिली मागणी मी केली होती. माझ्या बोलण्यामुळे राज्य हलले असते तर आता जे ते बोलताय ते पूर्वी का बोलले नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.