दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर पदयात्रेदरम्यान हल्ला झाला आहे. आपने यासाठी भाजपला जबाबदार ठरवले आहे. भाजपने पाठवलेल्या गुंडांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आपने केला आहे.
अरविंद केजरीवाल जी पर हुआ हमला बेहद निंदनीय और चिंताजनक है। यह साफ है कि भाजपा ने अपने गुंडों से यह हमला कराया है।
अगर अरविंद केजरीवाल जी को कुछ होता है, तो उसकी पूरी ज़िम्मेदारी भाजपा पर होगी। हम डरने वाले नहीं हैं—आम आदमी पार्टी अपने मिशन पर डटी रहेगी। #AttackOnKejriwal
— Manish Sisodia (@msisodia) October 25, 2024
केजरीवाल यांच्यावर झालेला हल्ला हा नींदनीय आणि चिंताजनक आहे अशी प्रतिक्रिया मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. तसेच भाजपने गुंड पाठवून हा हल्ला केला आहे असेही सिसोदिया म्हणाले आहेत. तसेच जर उद्या केजरीवाल यांना काही झाले तर त्यासाठी भाजप जबाबदार राहिल, आम्ही यामुळे घाबरणारे नाही असेही सिसोदिया म्हणाले.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही या हल्ल्यासाठी भाजपला जबाबादार ठरवले आहे. भाजपने आधी केजरीवाल यांना खोट्या केसेसमधून तुरुगांत टाकलं, केजरीवाल तुरुगांत असताना त्यांना औषधं मिळू दिली नाही, भाजप केजरीवाल यांना रोख पाहत आहे, भाजपला केजरीवाल यांचा जीव घ्यायचा आहे असा आरोपही आतिशी यांनी केला आहे.