बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात गिरगावातील मंगलवाडी येथे जन आक्रोश आंदोलन

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात गिरगावातील मंगलवाडी येथे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. त्यात गिरगावातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार आणि विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बर्वे यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबावे यासाठी हिंदुस्थान सरकारने तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन केंद्र सरकारला केले.