एटीएम ट्रान्झॅक्शनमध्ये 1 मेपासून बदल

एसबीआयने एटीएमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 1 मेपासून बदल करण्याची घोषणा केली आहे. एसबीआय ग्राहकांना आता दर महिन्याला 5 फ्री एटीएम ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत. फ्री ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर ग्राहकाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपये प्लस जीएसटी द्यावा लागणार आहे. दुसऱया बँकेच्या एटीएमवर हे शुल्क 21 रुपये प्लस जीएसटी आहे. यातही बँक खात्यात जर 25 ते 50 हजार रुपये बॅलन्स असेल तर दुसऱया बँकेच्या एटीएमवर 5 फ्री ट्रान्झॅक्शन मिळतील. तर खात्यात एक लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर सर्व बँकेच्या एटीएमवर फ्री ट्रान्झॅक्शन मिळतील.