मोदी सरकारने बँकांना ‘कलेक्शन एजंट’ बनवलंय, मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्याच्या निर्णयावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या निर्णयाला त्यांनी जनविरोधी असल्याचं म्हणत सरकार बँकांना ‘कलेक्शन एजंट’ बनवत असल्याचा आरोप केला आहे. खर्गे म्हणाले की, या शुल्कवाढीमुळे सामान्य जनतेची लूट होत असून, सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारत आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना म्हटले की, “मोदी सरकारने बँकांना कलेक्शन एजंट बनवले आहे. मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास दंडाच्या नावाखाली बँकांनी जनतेकडून तब्बल 43,500 कोटी रुपये वसूल केले आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 28 मे रोजी एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क वाढवण्यासाठी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार, 1 मे पासून जर ग्राहकांनी एटीएममधून मासिक मोफत व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्यांना पुढील व्यवहारासाठी अतिरिक्त 2 रुपये द्यावे लागतील. यावरूनच त्यांनी ही टीका केली आहे.