3 महिन्यांत दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर काढले!

केंद्रातील भाजप सरकारने सोमवारी रात्री माझ्या अधिकृत निवासस्थानातून माझे सामान बाहेर फेकून दिले. मागील तीन महिन्यांत दुसऱ्यांदा अशी घटना घडली, असा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी केला.

आजआम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते भाजपचे बडे नेते दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबद्दल काहीही प्रचार करत आहेत. मिनी बार, स्विमिंग पूल असल्याचे सांगितले जाते. मात्र, याच दिल्लीत पंतप्रधानांनी 2700 कोटी रुपयांचा राजमहल बांधला आहे, असा हल्ला संजय सिंह यांनी चढवला.