![cm atishi resing (1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/cm-atishi-resing-1-696x447.jpg)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला पराभवाला सामोरे जावे लागले. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि तीन वेळा मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा धक्का बसला. भाजपने ‘आप’चा ‘दारू’ण पराभव करत दिल्ली केजरीवालमुक्त केली. या मोठ्या अपयशानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांनी सातवी विधानसभाही बरखास्त केली आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लेना या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या. मात्र पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे अतिशी यांनी रविवारी नायब राज्यपाल व्ही. के सक्सेना यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपुर्द केला. अतिशी यांनी 21 सप्टेंबर, 2024 रोजी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला होता. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवत दिल्लीची सत्ता मिळवली. तर आपला या निवडणुकीत केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीच्या सत्तेच्या चाव्या भाजपकडे आल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या ते दिल्लीच्या मुख्यमंत्री, असा आहे आतिशी यांचा राजकीय प्रवास