दिल्लीची धुरा पुन्हा महिला मुख्यमंत्र्याकडे, थोडक्यात जाणून घ्या अतिशी यांची माहिती

अतिशी मार्लेना या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारणार आहेत. आप पक्षाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पदावर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.  त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

आतिशी मार्लेना यांच्या नावाबाबत खूप चर्चा आहे. मार्लेना हे नाव कसे बनले याबाबत चर्चा आहे. शाळेमध्ये असताना महाविद्यालय शिक्षणादरम्यान त्या लेनिनवाद आणि मार्क्सवादाने खूप प्रभावित झाल्या होत्या.त्यामुळे मार्क्स आणि लेनीन यांच्या नावाला एकत्र करून मारलेना हे नाव बनले आणि हेच नाव त्यांनी स्विकारले. त्या पंजाबी रजपूत समूदायातून आहेत.त्यांचे शिक्षण दिल्लीतील  स्प्रिंगडेल शाळेतून झाले असून त्यांनी परदेशात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या त्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. आता ते पदभार कशा स्विकारणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

आतिशी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, आतिशी मारलेना यांच्याकडे 1 कोटी 41 लाखांची संपत्ती आहे. त्यांनी शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये कोणतीही गुंतवणुक केलेली नाही. एलआयसी पॉलीसी, फिक्स डिपॉझिट याच्यामध्येच त्यांची गुंतवणुक आहे. त्यांच्याकडे स्वत:च्या नावावर घर किंवा जमीन नाही.