कार्यतत्पर एसीपी महेश देसाई सेवानिवृत्त

मुंबईतील अंडरवर्ल्ड संपविण्यात ज्यांचा मोलाचा सहभाग होता असे मुंबई डिटेक्शन क्राईम ब्रँचचे धडाडीचे सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई हे मेअखेरीस आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले.

दाऊद टोळीतील खतरनाक गुंड निजाम कोकणी, छोटा राजन टोळीतील रम्या बटलर आदी 28 गुंडांना चकमकीत ठार मारून महेश देसाई यांनी मुंबईतील गँगवॉर व शूटआऊटवर ज्येष्ठ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण आणले होते. 100च्या वर अग्निशस्त्र्ाs व स्पह्टकांचा साठा जप्त केला. गुंतागुंतीच्या 25 च्या वर ‘मर्डर केस’ डिटेक्ट केल्या. मुंबईतील बॉम्बस्पह्ट मालिकांवर प्रकाश टाकला. 30 पेक्षा अधिक घरपह्डय़ा उघडकीस आणल्या होत्या.

कोरोना काळात महेश देसाई यांनी अतिशय देदीप्यमान कामगिरी केली. ‘मास्क’चा तुटवडा असताना त्याची चढय़ा भावाने विक्री करणाऱया टोळीकडून एसीपी महेश देसाई व त्यांच्या सहकाऱयांनी 25 कोटी रुपयांचा ‘मास्क’चा साठा पकडून तो मुंबई महापालिका व शासकीय रुग्णालयांना वितरित केला. या कारवाईचे मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत महेश देसाई व त्यांच्या सहकाऱयांचे जाहीरपणे काwतुक केले होते. अशा कर्तबगार, तडफदार अधिकाऱयाने सिने अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर हल्ला करणाऱया बिष्णोई टोळीच्या आरोपींना अटक करण्यासाठीही अथक प्रयत्न केले होते. त्यामुळेच आरोपी 36 तासांत जेरबंद झाले. या कार्यतत्पर, मेहनती अधिकाऱयाला मुंबई डिटेक्शन क्राईम ब्रँचच्या अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी 31 मे रोजी आयोजित केलेल्या निरोप समारंभात भावपूर्ण निरोप दिला तेव्हा अनेकांना गहिवरून आले.