हडपसर मतदारसंघात महाविकास, महायुतीचे चेतन विधानसभा आघाडीचे प्रशांत जगताप तुपे आणि मनसेनेचे साईनाथ बाबर यांच्यात लढत होत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या मतदारसंघात दोन राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांमध्ये थेट लढत होणार आहे. मराठा, माळी आणि मुस्लिम मतांवर येथील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने विद्यमान आमदारांवर नाराजी असल्याची चर्चा या मतदारसंघात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या कार्यशैलीचा लौकीक सर्वश्रुत आहे. या मतदारसंघातील आमदार बदलाची परंपरा आहे, ती कायम राहणार की कसे, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
प्रमुख उमेदवारांसह एकूण 19 उमेदवार रिंगणात आहेत. 2009 मध्ये परिसीमानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून आतापर्यंत याठिकाणी तीन निवडणुका झाल्या आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी येथून प्रत्येकी एकदा विजय मिळवला. 2009 मध्ये शिवसेनेकडून महादेव बाबर, 2014 मध्ये भाजपचे योगेश टिळेकर, तर 2019 मध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी झाले आहेत. यावेळी शरद पवार गटाने प्रशांत जगताप यांना, तर अजित पवार गटाने चेतन तुपे यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन्ही गट एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळे जनता कोणाला कौल देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हडपसर ते कात्रजपर्यंत असलेल्या मतदारसंघात माळी, मराठा आणि मुस्लिम समाजांचे प्राबल्य आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर यावेळी प्रामुख्याने मूळ राष्ट्रवादीतच लढत होत आहे. पक्षफुटीच्या घडामोडीनंतर या मतदारसंघात ताकदीची गणिते बदलली आहेत. महायुतीला भाजप आणि मिंधे गटाची मदत मिळणार असली, तरी मिंधे गटाची फारशी ताकद नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ताकद मोठी आहे. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकदही मोठी आहे. त्यामुळे मनसेची काहीशी ताकद जरी असली, तरी यंदा मतांचा टक्का वाढवणे मनसे पुढे आव्हान आहे.
बारामतीकर जनतेने केलेला माझा करेक्ट कार्यक्रम मी स्वीकारला! – अजित पवार
2019 च्या निवडणुकीत तुपे यांना सुमारे तीन हजारांचे मताधिक्य होते. मात्र, पक्ष फुटल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना सुमारे 13 हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण आहे.
हडपसरमधील रस्ते, वाहतूककोंडी, वर्षानुवर्षे रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता, अपुरा पाणीपुरवठा, कचरा, अवैध धंदे आदी प्रश्न प्रलंबित आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप हे नगरसेवक, महापौर राहिले होते. तर, शहरप्रमुख म्हणून संपूर्ण शहराच्या प्रश्नांसाठी त्यांच्या कामांचा धडाका सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी नगरसेवक योगेश ससाणे हेदेखील जगताप यांच्यासोबत आहेत.
तळेगावमधील फॉक्सकॉन प्रकल्प भाजपने ओढून नेला ! खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात