
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे आज दुपारी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार उद्या (मंगळवार) दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे, तर बुधवारी निवडणूक होईल. महायुतीच्या सत्तावाटपात विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अण्णा बनसोडे यांच्यासह राजकुमार बडोले या दोन दलित नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.