आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, संपर्कप्रमुख विलास घोगरे यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाले. महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांनी हे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा संपर्कप्रमुख विलास घोगरे यांनी केले.

शिवसेना नगर शहर विधानसभा संपर्कप्रमुख विलास घोगरे यांचा नगर शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम, युवासेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, रवि वाकळे, हर्षवर्धन कोतकर, बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, योगिराज गाडे, श्याम नळकांडे, अमोल येवले, प्रशांत गायकवाड, विजय पठारे, दत्ता जाधव, परेश लोखंडे, संतोष गेनप्पा, दत्ता कावरे, दीपक खैरे, संग्राम कोतकर, सुरेश तिवारी, अशोक दहीफळे, बबलू शिंदे, श्रीकांत चेमटे, संदीप दातरंगे, गौरव ढोणे, अरुण झेंडे, मुन्ना भिंगारदिवे, राजेंद्र भगत, पप्पू भाले, सुनील त्रिपाठी, विशाल वालकर, सुरेश क्षीरसागर, अण्णा घोलप, अभिजित अष्टेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विलास घोगरे म्हणाले, ‘नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेत आहेत, ही चांगली बाब आहे. स्वर्गीय अनिल राठोड यांचे या मतदारसंघावर नेहमीच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे कसा राहील, यासाठी प्रयत्न करू. तसेच आगामी मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महाविकास आघाडीचे वर्चस्व कसे राहील, यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत,’ असे आवाहनही त्यांनी केले.

संभाजी कदम यांनी नगर शहर शिवसेनेच्या कार्याचा आढावा सादर केला. यावेळी संभाजी कदम यांनी नगर विधानसभेची जागेवर माजी मंत्री स्व. अनिल राठोड हे पाच वेळा निवडून आले होते. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी, असा ठराव केला. त्यास विक्रम राठोड यांनी अनुमोदन दिले व सर्वच पदाधिकाऱयांनी त्यास पाठिंबा दिला.