Assam खाणीतून 4 मृतदेह काढले

 

आसामच्या दीमा हसाओ जिह्यातील तब्बल 300 फूट खोल कोळच्या खाणीतून मजूरांना बाहेर काढण्याचे काम आज सातव्या दिवशीही सुरू होते. आतापर्यंत 4 मजूरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आणखी 5 मजूर खाणीत अडकून पडले आहेत. लष्कर आणि एनडीआरएफ हे संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत.