>>अस्मिता प्रदीप येंडे
लेखक श्रीनिवास सावंत यांचे ‘गोष्ट नव्या वयाची’ हे पुस्तक स्व-प्रतिमा कशा प्रकारे निर्माण करावी, आपले स्वतंत्र अस्तित्व कसे विकसित करावे, याचे कृतियुक्त मार्गदर्शन करणारे आहे. पुस्तकाच्या शीर्षकातच सकारात्मक ऊर्जा भरलेली आहे. काही गोष्टी या वयाच्या विशिष्ट टप्प्यात व्हाव्या लागतात, पण जेव्हा एखादी स्त्राr स्वतच्या पायावर उभे राहून या गर्दीत स्वतचे वेगळे स्थान प्रस्थापित करत असते. त्यामुळे उत्कर्षाच्या टप्प्याकडे जाणारा जो प्रवास आहे, तो प्रवास म्हणजे ‘गोष्ट नव्या वयाची.’ ज्या स्त्रियांना कौटुंबिक जबाबदाऱया, घर-संसारातील अडचणी, आर्थिक-मानसिक परिस्थिती वा आत्मविश्वास नसल्याने आपली स्वप्ने, इच्छा पूर्ण करता आल्या नाहीत, त्या महिला वर्गासाठी हे पुस्तक आत्मिक बळ देणारे आहे, ‘गोष्ट नव्या वयाची’ या पुस्तकात शमिका आणि अस्मिता अशा दोन स्त्राr पात्रांच्या माध्यमातून लेखकाने स्वयंविकासाच्या विविध पायऱया अगदी सोप्या स्पष्टीकरणासहित मांडल्या आहेत.
पुस्तकात एकूण 17 प्रकरणे असून व्यक्तिमत्त्व विकासासाठी, आपले करीअर घडवण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत त्याची अगदी प्राथमिक माहितीसुद्धा दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणातून कौशल्यपूर्ण विकासाच्या पायऱया आणि त्यातील मुद्दे सविस्तर दिलेले आहेत. सर्वात आधी स्वतला स्वतशी ओळख हेणे गरजेचे आहे. स्वतचा स्वीकार करायला हवा. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात किंवा आवडत नाहीत, आपले छंद, आपली स्वप्ने, आपली मते यांची यादी बनवून त्या यादीनुसार स्वतवर काम करणे, आत्मविश्वास वाढवणे, आपल्यातील चांगले-वाईट गुण, आपल्या भावनांवरील आपला ताबा, जगाकडे पाहण्याची दृष्टी, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, आपली प्राथमिकता आणि आपल्या ज्ञानाचा सदुपयोग या विविध घटकांचा विचार या पुस्तकात सजगतेने केलेला आहे. लेखकाने पुस्तकात तांत्रिक माहिती न देता दोन मैत्रिणींच्या गप्पागोष्टींमधून स्त्रियांना स्वतची स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. बऱयाच कालावधीनंतर नव्याने करीअर घडवू पाहणाऱया स्त्रियांसाठी मानसिक पाठबळ देणारे हे पुस्तक आहे.
गोष्ट नव्या वयाची लेखक- श्रीनिवास सावंत
प्रकाशक – सायली क्रियेशन्स
मूल्य- 200 रुपये.