मालाड-मालवणी येथील दोन रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप रुग्णालये सुरू करण्यात आलेली नाहीत. ही रुग्णालये सुरू नसल्याने रहिवाशांना मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ही रुग्णालये त्वरित सुरू करण्याची मागणी काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली. कोणत्याही रुग्णालयाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर त्या रुग्णालयासाठी आवश्यक डॉक्टर्स, सर्जन, परिचारिका व इतर कर्मचाऱयांच्या नियुक्तीची प्रक्रिया राबवणे गरजेचं आहे. मात्र मालाड-मालवणी मधील रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण होऊनही डॉक्टर्स व अन्य कर्मचारी नसल्याने रुग्णालयांची सेवा सुरू करण्यात आलेली नाही. बोरीवली येथील भगवती हॉस्पिटलच्या कामातील दिरंगाई व दर्जाचा मुद्दादेखील उपस्थित केला. या निकृष्ट कामांची दक्षता विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.