
ोम्हाडाच्या संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना म्हाडाकडून त्रास दिला जात आहे त्यामुळे संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली. म्हाडा संक्रमण शिबिरांमधील रहिवाशांकडून वारेमाप भाडे आकारत आहे, रहिवाशांना घराबाहेर काढले जात आहे. त्यांना अकारण त्रास दिला जात आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणींमध्ये वर्गीकरण करुन शुल्क आकारुन कायमस्वरुपी घरे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता. त्यानंतर काही लोकांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली व या निर्णयावरती स्थगिती आली. मात्र त्यांनतर सरकारकडून या रहिवाशांना न्याय मिळावा, याकरिता ठोस पाऊले उचलण्यात आली नाहीत. ही स्थगिती उठावी यासाठी सरकारने चांगला वकील देऊन ही स्थगिती उठवण्यासाठी पाऊले उचलण गरजेचे आहे. सरकारने या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या विषयावर लवकरात-लवकर योग्य निर्णय घेऊन तोडगा काढण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.