आशियाई युवा ऍथलेटिक्स अजिंक्यपद, शौर्या अंबुरेला 100 मीटर अडथळा स्पर्धेत कांस्य

सौदी अरब येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई युवा ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानच्या शौर्या अंबुरने वेगवान कामगिरी करताना 18 वर्षांखालील मुलींच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत कांस्य पदक पटकावण्याचा पराक्रम केला.

18 वर्षांखालील सहावी आशियाई युवा ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा  सौदी अरेबियाच्या दमाम येथे 15 ते 18 एप्रिलदरम्यान झाली आणि यात 30 आशियाई देशांनी सहभाग घेतला होता. यात हिंदुस्थानच्या 26 खेळाडूंचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता. मुलींच्या अंतिम 100 मी अडथळा शर्यतीमध्ये शौर्याने 13.8 सेकंदांची वेळ नोंदवत सर्वोत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी केली. तिची ही कामगिरी कांस्य विजेती ठरली. यामुळे शौर्या सध्या 100 मीटर अडथळा स्पर्धेत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आली आहे.