
>> अश्विन बापट
लग्नात नववधूचं किंवा एखाद्या सोहळ्यात स्त्राrचं सौंदर्य खुलवते ती तिची मेंदी. सोळा शृंगारातही मेंदीचा समावेश होतो. कवी-गीतकारांनीही मेंदीला मानाचं पान दिलं आहे. ‘खुलवते मेंदी माझा’, ‘तळव्यावर मेंदीचा’ किंवा ‘मेंदीच्या पानावर’…सारखी गीतं आजही आपल्या ओठांवर आहेत. मेंदीच्या या कलेचे व्यवसायात रूपांतर करून त्यातून रोजगार निर्मिती करून दाखवली आहे मेंदी आर्टिस्ट कोमल खोत या तरुणीने…
कोमल खोतच्या वाटचालीबद्दल अधिक जाणून घेताना ती म्हणाली, “मी बी.कॉम’’ करता करताच खऱया अर्थाने या मेंदीच्या प्रेमात पडले. कॉलेजच्या अखेरच्या वर्षाच्या दरम्यानच मेंदीचा कोर्स केला. माझी आई माझ्या बाजूने फारशी नव्हती. मात्र तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता, पण बाबांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. सीएस करण्याची तयारी सुरू होती. त्याच वेळी 2015 मध्ये मेंदीचा कोर्स केला. या कलेकडे ओवालागला. मग 2016 मध्ये प्रोफेशनली हळूहळू काम सुरू केलं. त्याच वेळी मेंदी क्लासेस सुरू केले. कोरोना काळात मी ऑनलाइन मेंदी क्लासेसही घेतले, तर आताही वर्षातून 20-20 जणींच्या दोन बॅचेसना मी शिकवते. साधारण दोन महिने हे क्लासेस सुरू असतात. हे क्लासेस आजतागायत सुरू आहेत.
पुढे 2017 या वर्षापासून मी मेंदीकडे करीअर म्हणून पाहत आणखी मोठय़ा जोमाने उतरले. तेव्हा माझी एक विद्यार्थिनी माझ्यासह मेंदी कायासाठी व्यावसायिकदृष्टय़ा माझ्या सोबत होती. आज 2025 मध्ये माझ्याकडे 30 जणींची टीम आहे. नोव्हेंबर ते मे या काळात खूप काम असतं. त्यातही नोव्हेंबर-डिसेंबर लग्नाचा मोसम असल्याने आम्ही जास्तच बिझी असतो. पावसाळ्याचे महिने तसे थंड जातात. विवाह सीझनमध्ये काही वेळा दिवसाला तीन-तीन लग्नांच्या ऑर्डर्स आम्ही करतो. एका वधूची मेंदी कायासाठी मला अंदाजे चार तास लागतात. एक दिवस असा आठवतो, त्या दिवशी मला तीन ठिकाणी लग्न सोहळ्यांना जायचं होतं. मी सकाळी 8 ते 12 ठाण्यात, मग दुपारी 1.30 ते सायंकाळी 6 ठाण्यातच आणि रात्री 8 ते साधारण मध्यरात्री 1.30 वाजेपर्यंत वरळीत जाऊन मेंदी कामेंदी कामी त्या-त्या क्लाएंटचा मेंदीसंदर्भातला विचार काय, त्यांना कशाला प्राधान्य द्यायचंय हे लक्षात घेते. मग लोकेशनवर जाऊन त्या मुलीचा हात, तिचं व्यक्तिमत्त्व, तो सोहळा नेमका कोणता आहे हे सारं लक्षात घेऊन मेंदीची डिझाइन ठरवते. मेंदी आर्टिस्टने पॅशनेट असायला हवं. क्रिएटिव्ह माइंड महत्त्वाचं. तसंच सोहळ्यांमध्ये आजूबाजूला 100 माणसं तरी वावरत असतात. त्यामुळे गजबजाट असतो. त्याही वातावरणात शांत चित्ताने तुम्हाला मेंदी कालागते. याकरिता एकाग्रता परमोच्च क्षमतेची लागते. शिवाय डिझाइन सेन्स लागतो. मेंदी काबॅलन्स महत्त्वाचा. हाताचा पुचा आणि मागचा भाग जर तुम्ही मेंदी काअसाल तर तो समतोल दिसायला हवा किंवा एकाच हाताच्या तळव्यावर जर मेंदी काअसाल तर त्यामध्येही समानता असायला हवी. कुठेही नक्षीचा बॅलन्सिंग चुकता कामा नये.
आपल्या राज्यात नक्षीकाम, कोरीव कामात मेंदीच्या डिझाइन्सना जास्त मागणी असते, तर गुजरातसारख्या राज्यात नक्षीदार मेंदीपेक्षा जास्त प्राधान्य स्त्राr-पुरुषांच्या चित्रांना असतं. तिथे मेंदी कलाकारांचं प्रमाणही मोठं आहे. हरीन दलाल हे मेंदी क्षेत्रातलं मोठं नाव आहे. मलाही त्यांचं मार्गदर्शन लाभलंय.
“यातलं आर्थिक गणित कसं आहे, कुठे कुठे ऑर्डर्स येत असतात’’ असं विचारलं असता कोमल म्हणाली, “सुरुवातीला एका मेंदीसाठी अंदाजे साडेचार हजार इतकं मानधन मिळायचं. आता याकरिता 12 हजारांपर्यंत मानधन मिळतं, तर मी अशाही आर्टिस्ट पाहिल्यात, ज्या एक ते दीड लाख रुपये एका मेंदीसाठी चार्ज करतात. अर्थात तुमची मेंदी खुलल्यावर त्या स्त्राrचा चेहरा जेव्हा खुलतो तो आनंद अधिक समाधान देऊन जातो, जे मोलाचं आहे. मला मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोलावतात. तसंच परदेशातूनही अनेक ऑर्डर्स येत असतात. मला ईस्ट आफ्रिकेतील सेशल्स आयलंडवर एका सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. अगदी दुबई, सौदीतूनही मला अनेक जण मेंदीबद्दल विचारत असतात. आज जेव्हा माझी ही वाटचाल आई पाहते तेव्हा तिला माझा नक्कीच अभिमान वाटतो. आज वास्पर्धा लक्षात घेऊन मेंदीच्या साथीने मेकअप करायला मी सुरुवात केली आहे. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे, असं गप्पांची सांगता करताना कोमलने सांगितलं.
(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर –
सीनियर न्यूज अँकर आहेत.)