
संतोष देशमुख यांना कराड गँगने दिलेल्या मरणयातनांचे पह्टो पाहून अस्वस्थ झालेल्या केज येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केजमधील जानेगाव येथे बुधवारी घडली. हे फोटो पाहून जानेगाव येथील अशोक शिंदे (23) हा प्रचंड अस्वस्थ झाला. हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्येही तो सहभागी झाला होता. सायंकाळी त्याने बहिणीला फोन केला आणि संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल भावनावश होऊन बोलला. बहिणीशी बोलल्यानंतर त्याने मोबाईल बंद केला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.