माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकाबाबत एनडीएकडून राजकारण करण्यात येत आहे. यावर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजप स्वतःला सुसंस्कृत पक्ष म्हणवतो, हाच त्यांचा सुसंस्कृतपणा आहे काय? असा संतप्त सवाल गेहलोत यांनी केला आहे.देशाच्या माजी पंतप्रधानाच्या स्मारकाबाबत राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना जगभरात आदर आणि मानाचे स्थान आहे. जेव्हा ते बोलत होते, तेव्हा जगभरात त्यांचे भाषण ऐकले जात होते. अशा ज्येष्ठे नेत्याचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकार राजकारण करत आहे. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजघाटावरील जागा देण्याबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवर गेहलोत म्हणाले की, ही जमीन द्यायची होती, मग आधी का जाहीर केले नाही? देशभरातून आवाज उठू लागले आणि तीव्र नाराजी व्यक्त होतानाच सरकारने ही घोषणा का केली? असा सवालही गेहलोत यांनी केला आहे. तसेच अशा ज्येष्ठ नेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी विशेष स्थान देण्याएवजी सरकारने निगम बोध घाटाची निवड का केली, असा सवालही त्यांनी केला.
NDA सरकार ने डॉ मनमोहन सिंह जी जैसे महान व्यक्तित्व के अंतिम संस्कार एवं स्मारक बनाने को लेकर अनावश्यक विवाद पैदा किया है। जिस व्यक्तित्व को दुनिया सम्मान दे रही है उनका अंतिम संस्कार भारत सरकार किसी विशेष स्थान की जगह निगम बोध घाट पर करवा रही है।
2010 में हमारी सरकार ने भाजपा…
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) December 28, 2024
डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या महान व्यक्तीच्या अंत्यसंस्कार आणि स्मारकाच्या बांधकामाबाबत एनडीए सरकारने विनाकारण वाद निर्माण केला आहे. ज्या व्यक्तीचा जगभरात आदर केला आहे, त्यांच्या अंत्यसंस्कार आणि स्मारकाबाबत राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, 2010 मध्ये भाजपने कोणतीही मागणी न करता माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांच्या निधनानंतर आमच्या सरकारने त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जयपूरमध्ये तात्काळ विशेष जागा दिली आणि त्यांचे स्मारक बांधले. तसेच 2012 मध्ये महाराष्ट्रात हिंदुहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर काँग्रेस सरकारने मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये विशेष जागा दिली. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, याची आठवणही गेहलोत यांनी करून दिली.
काँग्रेसने नेहमीच सर्व पक्षांच्या नेत्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला. पण भाजपने डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी केलेले असे वागणे दुर्दैवी आहे. त्यांच्या निधनाने आज संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सरकारच्या भूमिकेवर देशातील जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. जनभावनेच्या दबावाखाली भाजप सरकारने भविष्यात स्मारक उभारण्याची घोषण केली आहे. मात्र, या मुद्द्यावर राजकारण करणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले.