>> आशीष निनगुरकर
तरुणांना रस्त्यावर उतरून संघर्ष करता येत नसला तरी त्यांनी पुढे येऊन विचार मांडणे आवश्यक आहे. मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला हवे. योग्य वेळी बोलता यायला हवे. नुकत्याच झालेल्या `युवा दिना’च्या निमित्ताने आजच्या युवापिढीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
भारतात दरवर्षी 12 जानेवारीला `राष्ट्रीय युवा दिन’ मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंतीदेखील असते. भारत सरकारने 1984 मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा दिवस हा `राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 1985 पासून दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी `राष्ट्रीय युवा दिन’ साजरा केला जातो. ही परंपरा आजतागायत कायम आहे. आजच्या दिवशी देशात सर्वत्र स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आणि युवादिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये व सरकारी कार्यालयांमध्ये विविध कार्पामांचे आयोजन केले जाते. हा दिवस साजरा करण्यामागचा आणखी एक हेतू म्हणजे आजच्या तरुणाईमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांबद्दलचे महत्त्व वाढवणे हा आहे.
तरुणाईच्या हातात देश सुरक्षित राहायला हवा अशी जगाची अपेक्षा असते. परंतु देशाच्या सुरक्षिततेआधी आपली, आपल्या नोकरीची आणि परिवाराची सुरक्षितता महत्त्वाची मानून `आपण बरं आणि आपलं काम बरं’ अशा भावनेतून आपल्यापैकी अनेक जण आजूबाजूला घडणाऱया गोष्टींकडे दुर्लक्ष करत पुढे सरकत राहतात.दिवस पुढे जात राहतात आणि मग एखाद्या ताज्या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्याला सत्व तपासून पाहण्याची संधी मिळते. गेल्या काही वर्षांत आपल्याला अशा अनेक संधी मिळत आहेत. कधी भाषिक अस्मिता, तर कधी कडवी आाढमक भूमिका घेणाऱयांच्या निमित्तानं आपण कोडय़ात पडतो. खरोखरच आपली म्हणून काही भूमिका आहे काय, तशी ती असल्यास जाहीरपणे आपण ती मांडू शकतो का आणि तशी भूमिका मांडल्यानंतर होणारी टीका स्वीकारायची आपली तयारी आहे काय? नोकरीत तणाव, आवराआवरीची धावपळ आणि थकून जाणारं मन व शरीर याला आपल्यातला प्रत्येक जण सभ्य, सुशिक्षित असताना संघर्षापासून भूमिका घेण्यापासून दूर राहू लागलो, तर नेमकी समजोपयोगी भूमिका घेणार कोण? आवर्जून काही सांगायची तीव्र गरज असतानाही गप्प बसून राहिल्यामुळे समाजात पसरत राहणारे चुकीचे विचार अधिक टोकदार बनले तर येणारा भविष्यकाळ आपल्याला क्षमा करेल काय? या प्रश्नांचा विचार करायला हवा. रस्त्यावर उतरून संघर्ष करता येत नसला तरी पुढे येऊन विचार मांडणे आवश्यक आहे. मनमोकळेपणाने व्यक्त होणे गरजेचे आहे. नाहीतर आपल्या भावनांचा एकत्र उद्रेक झाला की, त्याचा काय उपयोग? तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते.त्यापेक्षा योग्य वेळी बोलता यायला हवे. आजच्या काळात नुसते शांत बसणे किंवा बघ्याची भूमिका घेणे हा गुन्हा आहे.
एरवी आपण आपल्याच कामात म्हणजे नोकरीत किंवा व्यवसायात व्यस्त असतो. स्वतला द्यायला आपल्याकडे जरासुद्धा वेळ नसतो. त्यामुळे जरासा वेळ काढून मिळालेला हा वेळ सत्कारणी लावणे गरजेचे आहे.
आजच्या तरुणाईबद्दल बोलायचे ठरले तर फारच चित्र-विचित्र अवस्था आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये शिरलं की, मन अगदी प्रसन्न होऊन जातं. या तरुणाईत फेरफटका मारल्यानंतर नवीन पंख घेऊन उडू पाहणारी ही पाखरं वेगवेगळ्या कल्पनेत रमताना दिसतात.नवनवीन फॅशन करू पाहणारी ही तरुणाई कट्टय़ावर आल्यानंतर त्यांच्या विविध विषयांवरील चर्चा, प्रसंग व मतं मांडताना पाहून बरं वाटतं. मात्र मी नेमका कोण आणि बदलत्या परिस्थितीत माझं खरं स्थान काय आहे, हा प्रश्न आपल्यापैकी किती तरुणांना पडतो? शिक्षण, उच्च शिक्षण, रोजगार, लग्न आणि सेटल होणं या मार्गानं सुरू असलेला आपला सरधोपट प्रवास यात उमेदीची 15 वर्षे तरी जातातच. इतकी वर्षे घालवल्यानंतर आणि `दोनाचे चार’ झाल्यानंतर संसाराची काळजी घेण्याची जबाबदारी पडते. चाळीशीपर्यंतचा माणूस तरुण मानला जात असला तरी तरुणाईत अपेक्षित असलेला जोश, संस्कारांचं उपयोजन आणि समाजभिमुखता खरोखरच कितपत जपता येते, असा प्रश्न आजघडीला पडतो आहे.
आपली भविष्यातील ओळख काय असावी याचे असे सुस्पष्ट चित्र घटनात्मक स्वरूपात आपल्या भावी पिढय़ांपुढे ठेवणाऱया मोजक्या देशांमध्ये आपला देश आहे, हे आपले भाग्य आहे. ते चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणे, त्या ध्येयपूर्तीसाठी समाजाला दिशा देणे, समाजाची जडणघडण करणे, त्या चित्रातील तत्त्वांच्या विरोधी तत्त्वांशी अहिंसक संघर्ष करणे आणि ते चित्र प्रत्यक्षात आणल्यानंतर ते प्राणपणाने अबाधित राखणे, संवर्धित करणे हे आपल्या भावी नेतृत्वाचे इतिहासदत्त कर्तव्य आहे व तेच त्याच्यापुढील आव्हानही आहे. आपल्या देशाचा विकास म्हणजे वरील घटनात्मक स्वप्नाची परिपूर्ती. या स्वप्नपूर्तीला खीळ घालणाऱया अनेक समस्या आहेत.
गेल्या दहा हजार वर्षांत मानवी समाज शेतीप्रधान, उद्योगप्रधान आणि माहितीप्रधान अवस्थांमधून पांमित होत होत आता ज्ञानप्रधान व बुद्धिमत्ताप्रधान अवस्थेत प्रवेश करत आहे. पूर्वीच्या तीनही अवस्थांपेक्षा ही अवस्था मुळातच खूप वेगळी आहे. पूर्वीच्या अवस्थांमध्ये मानवी समाज ज्ञान वापरत नव्हता असे नाही, पण त्याच्या जीवनात ज्ञानाला मध्यवर्ती स्थान नव्हते. निसर्गसंपत्ती, खनिजे, कच्चा माल, ऊर्जा, जमीन, प्राण्यांचे व माणसांचे शारीरिक श्रम, आर्थिक भांडवल, माहिती आणि तिच्यावर वेगाने व स्वस्तात संगणकीय प्रािढया करण्याची क्षमता इत्यादींना मध्यवर्ती स्थान होते. एकविसाव्या शतकापासून मात्र नव्या व्यावसायिक ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होताना आपण बघत आहोत.
इंटरनेटमुळे भौगोलिक बंधने दूर सारून माहितीची सर्वदूर उपलब्धता आणि ज्ञानाची सहनिर्मिती विलक्षण वेगाने वाढत आहे. मानवी समाज जणू काही एका चिरायू अशा वैश्विक मेंदूची निर्मिती करत आहे आणि समाजातला प्रत्येक जण त्या मेंदूचा बव्हंशी मुक्त वापर करणार आहे. या पार्श्वभूमीवर आता आपल्या देशाला गरज आहे कोटय़वधी गरीब जनतेच्या जीवनातील वर उल्लेखलेल्या जटिल समस्या सोडवू शकणाऱया सर्जनशील, नवोन्मेषी ज्ञानकर्मींची आणि अशा असंख्य संवेदनशील व लोकाभिमुख ज्ञानकर्मींची चळवळ कशी निर्माण करायची व कार्यरत ठेवायची, हे भावी काळातील युवा नेतृत्वासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे. आढाळपाळ स्वरूप धारण करणाऱया वरील समस्यांची अशी अपारंपरिक सोडवणूक न केल्यास प्रगत देशांचा व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा नवा ज्ञानाधिष्ठित साम्राज्यवाद आपले शोषण करेल आणि मग आपल्या स्वातंत्र्याला ग्रहण लागेल. अशा साम्राज्यवादाला पूरक अशी भ्रष्ट व संधीसाधू (सत्ताधारी वर्ग, नफेखोर कॉर्पोरेट्स, विकाऊ मीडिया) यांची युती राज्यघटनेत अभिप्रेत असलेला आदर्श समाज प्रत्यक्षात आणू देणार नाही. असंघटित सामान्य जनतेच्या मागासलेपणाचा गैरफायदा उठवून अशा शक्तींनी केलेल्या आपल्या शोषणाचा इतिहास फार जुना नाही. आजही त्यांच्याकडून ते मोठय़ा प्रमाणावर चालू आहे. आपल्या देशातील 80 कोटी लोकांच्या भीषण दारिद्रय़ाचे ते मुख्य कारण आहे. दारिद्रय़मुक्त, विषमतामुक्त, सर्जनशील, नवोन्मेषी, स्वतंत्र वृत्तीच्या, आधुनिक नैतिक/जीवन-मूल्ये जपणाऱया, पर्यावरणसंवर्धक आणि लोकशाही समाजाच्या निर्मितीची जबाबदारी नवे ज्ञानाधिष्ठित समाजविकासकेंद्री नेतृत्वच पेलू शकेल. आपल्या देशाचे `भारत’ हे नाव या अर्थाने सार्थ करून दाखवणे, हे भावी युवा नेतृत्वासमोरील एक मोठे आव्हान आहे.
देशाचे भविष्य हे तरुणाईवर अवलंबून आहे. उद्याचा विकसित भारत हा तरुणांच्या हाती आहे, असे नेहमी म्हटले जाते आणि हे खरेदेखील आहे. कोणत्याही देशाच्या विकासामध्ये त्या देशातील तरुणाईचे योगदान असते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळणे, अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या राष्ट्रीय युवा दिनाचे खास असे महत्त्व आहे. समान विचारांचे काही मित्र उभे करणं आणि पुढल्या पिढीला या प्रागतिक व संस्कारी विचारांचं बाळकडू देणं गरजेचं आहे. वाद कुठल्याही गोष्टींनी उभा राहिला तरी आपलं सत्व न गमावता समाजाभिमुख विचार मांडत आत्मपरीक्षण करता यायला हवं. रोजच्या दगदगीतून वेळ काढत `मी माझा’च्या पलीकडे जाऊन इतरांसाठी, समाजासाठी काहीतरी करायला हवं. एक सुरुवात कुणीतरी करायला हवी तरच कदाचित त्यातून उद्याची रम्य पहाट उगवेल. आतातरी आपण आपले आत्मचिंतन करायला हवे आणि एक पाऊल `मी माझा’च्या पलीकडे टाकायला हवे.