Photo – आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुंबईभर विठुनामाचा गजर

पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी आणि भाविकांनी विठुनामाचा एकच गजर केला. मुंबईतही शिवसेना, सामाजिक संस्था, मंडळे यांच्या वतीने ठिकठिकाणी दिंडी आणि कीर्तन सोहळे आयोजित करण्यात आले. त्याचबरोबर जोगेश्वरी, विलेपार्लेसह अनेक ठिकाणी शिवसेनेच्या वतीने भाविकांसह सर्वसामान्यांना तुळशीच्या रोपाचे वाटप करण्यात आले. मुंबईही विठ्ठल, हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघाली होती.

Displaying wadala-Vaibhav.JPG

आषाढी एकादशीनिमित्त मुंबईतील वडाळा येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱया विठ्ठल मंदिरातही बुधवारी वारकरी आणि विठ्ठलभक्तांचा मेळा भरला. यावेळी पालकांबरोबर लहान मुलेही दिंडीत विठ्ठलनामाचा गजर करत मोठय़ा उत्साहाने सहभागी झाली होती. यावेळी मुलींनी फुगडी घालत दिंडीतील एकात्मतेची परंपरा जपत गोडवा वाढवला.

Displaying mandir-Vaibhav.JPGआषाढी एकादशीनिमित्त वडाळा येथील विठ्ठल मंदिरात शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी प्रीती देसाई, विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव, राकेश देशमुख, माधुरी मांजरेकर आदी उपस्थित होते.

Displaying rawate-vaibhav.JPG

दादर येथील विठ्ठल–रखुमाई मंदिर ट्रस्ट येथे शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी विधिवत अभिषेक व महापूजा केली. यावेळी ट्रस्टचे सदस्य माजी शाखाप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, उपविभागप्रमुख यशवंत विचले, भरत राऊत, संकेत शिवलकर, रेमंड डिसोजा आदी उपस्थित होते.

Displaying Hande 2.jpg

मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्मसंस्था संचालित दक्षिण मुंबईमधील 200 वर्षे पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना पदाधिकाऱयांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले.

Displaying Shedge 3.jpg

आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुधवारी शिवसेना विलेपार्ले विधानसभेच्या वतीने भाविकांसाठी पाच हजार तुळशी रोपांचे वाटप तेजपाल स्कीम रोड 3 येथील विठ्ठल मंदिराबाहेर करण्यात आले. अतिशय स्तुत्य कार्यक्रम म्हणून विधानसभेतील पदाधिकारी आणि भाविकांनी याचे कौतुक केले. विधानसभा समन्वयक जुईली शेंडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Displaying rel kamgaar sena-vaibhav.JPG

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त विठुमाऊलीची पालखी आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भजनाचे आयोजन करण्यात आले. प्लॅटफॉर्म नंबर सातवरून सुरुवात झालेली दिंडी रेल कामगार सेना कार्यालय आणि तिथून परत मुंबई मोटरमन लॉबी येथे आरती करून सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास रेल कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव, योगेश जाधव, नरेंद्र तळेकर, विजय शिरोडकर, संतोष शेलार, भारत शर्मा, प्रशांत कमांकर, तिरुमाळेश, अंजारा, प्रतीक गाईकर, मल्हारी बटाटे, अभिजित भोसले, कमलेश देवरुखकर, नीलेश भानुशाली यांच्यासह सहकारी उपस्थित होते.

Displaying IMG-20240717-WA1654.JPG

शिवसेनेच्यावतीने मिरा रोड येथे महिला आघाडीने दिंडी काढली. यावेळी जिल्हा संघटक स्नेहल सावंत-कल्सारिया, उपजिल्हा संघटक सुप्रिया घोसाळकर, प्राची पाटील, शहर संघटक श्रेया साळवी, उपशहर संघटक रश्मी महाडिक आदी सहभागी झाल्या होत्या.

Displaying borivali-Vaibhav.JPG

शिवसेना बोरिवली विधानसभा शाखा क्र. 13 आणि शिवतेज सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त रायडोंगरी, बोरिवली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना खिचडी, फळे आणि तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार विनोद घोसाळकर, विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, डॉ. नरेंद्रकुमार, विनय पाटील आणि पुरुष व महिला शिवसैनिक उपस्थित होते. शिवतेज संस्थेचे अध्यक्ष आणि उपविभागप्रमुख अशोक सोनवणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. श्री हरिभक्तांनी या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी करून भरभरून प्रतिसाद दिला.

Displaying BALA NAR-Vaibhav.JPG

जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या माध्यमातून शाखा क्रमांक 72, शाखा क्र. 73, शाखा क्रमांक 74, शाखा क्रमांक 77, शाखा क्रमांक 79, शाखा क्र. 78, शाखा क्र. 52 व 53 च्या वतीने आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त अनंत (बाळा) नर यांच्या वतीने जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात पाच हजार तुळशीच्या रोपटय़ांचे वाटप करण्यात आले. यावेळी जोगेश्वरी रवींद्र साळवी, भाई मिर्लेकर, महेश गवाणकर, प्रियांका आंधळे, नंदकुमार ताम्हणकर, उदय हेगिष्टे, रिटा राघवा, मंदार मोरे, रश्मी गोडांबे, अमरनाथ मालवणकर, सुभाष मांजरेकर, रूपेश कोळंबे तसेच सर्व उपशाखाप्रमुख, उपशाखा संघटक, महिला-पुरुष गटप्रमुख उपस्थित होते.

Displaying prathamesh (Vaibhav).JPG

युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त विभागातील रहिवाशांना तुळशीचे वाटप करण्यात आले. यावेळी कुलाबा विधानसभा समन्वयक अॅड. उदय बने, सुनील देसाई, माऊली प्रतिष्ठान उपाध्यक्ष व कुटुंब सखी अध्यक्ष पल्लवी सकपाळ, समन्वयक अपर्णा सावंत, नीलेश देवळेकर, माधुरी पेंढारी, मिलिंद झोरे, श्रेयस घरत, दिलीप म्हात्रे, शांताराम सुर्वे, अशोक मोरे, राजेश अवसरे, बंडय़ा सुर्वे, समीर भुवड, संतोष बाणे यांच्यासह पुरुष-महिला उपशाखाप्रमुख उपस्थित होते.

Displaying maharaj (Vaibhav).JPG

आषाढी एकादशीनिमित्त शिवसेनेच्या वतीने अंधेरी पश्चिम विधानसभा उपविभागप्रमुख, माजी नगरसेवक, आयोजक संजय पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रभाग क्रमांक 67 मधील संत नामदेव महाराज चौक, जेव्हीपीडी येथील वारकरी दिंडी शिल्पांना पुष्पहार घालून विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी विधानसभा संघटक संजय कदम, कीर्तनकार ह.भ.प. काशीनाथ पवार, महिला संघटक वीणा टाक, समन्वयक स्वाती घोसाळकर, उपविभाग संघटक रंजना पाटील, जोत्स्ना दिघे, राजेश खाडे, सुधाकर अहिरे, पूजा पाटील, नागराज काळबांडे, ह.भ.प. राजाराम जाधव, गणपत जाधव, दीपक चव्हाण, मोहन काजारे, रमेश पटेल, रमेश पाटील, विक्रांत परब, संदीप तिवारी, पंडित अवधेश पांडेय, मनोज पोईपकर, यश धुरी, शोभा हागे, सुहासिनी सावंत आदी उपस्थित होते.