
दुचाकीला वाचवताना काळीपिवळी विहिरीत कोसळून सात ठार तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना जालना ते राजूर रोडवरील तुपेवाडी शिवारातील वसंत नगर येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. मृतात चार महिलांचा समावेश आहे.
भोकरदन तालुक्यातील राजूर शिवारातील चनेगाव, तुपेवाडी, राजूर येथील भाविक हे आषाढीसाठी पंढरपूर येथे पंधरा दिवसांपूर्वी आगस्ट ऋषी महाराज तपोवन यांच्या दिंडीत पायी वारीत गेले होते. गुरुवारी ते चार वाजेच्या सुमारास राजूरकडे निघाले होते.