आसाराम बापूला अंतरिम जामीन

आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र या काळात त्याला आपल्या अनुयांना भेटता येणार नाही. एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. हृदयाशी संबंधित आजार असल्याने त्याच्यावर जोधपूर येथील आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्याला याआधी हृदयविकाराचा झटका आला होता.

18 डिसेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 85 वर्षीय आसाराम बापूची 18 दिवसांच्या पॅरोलवर सुटका केली होती. आता अंतरिम जामीन देण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने सात दिवसांचा पॅरोल दिला होता.