एकीकडे सरकार आरोग्य यंत्रणा तुमच्या दारी, अशा घोषणा देत असताना भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खौसावाडीवासीयांना अक्षरशः रोजच ‘सलाईनवर’ जीवन जगावे लागत आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह रस्ता नसल्याने पाच किलोमीटरची पायपीट करून झोळीतून गावात न्यावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबी कडू असे मृत महिलेचे नाव आहे. सरकारच्या बेफिकिरीपणामुळे गावकऱयांना मरणानंतरही नरकयातना भोगाव्या लागत आहेत. रस्त्याच्या नावाखाली केवळ लाखो रुपयांचे कंत्राट देऊन काम न केल्याने पेणमधील आदिवासी वाडय़ांचा विकास कागदावरच राहिला असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पेण तालुक्यातील खौसावाडी या गावातील 42 वर्षीय आंबी कडू या आदिवासी महिलेची तब्येत बिघडल्याने त्यांना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवसांनंतर त्यांची प्रकृती खालवल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयापासून वडगावपर्यंत मृतदेह गाडीतून आणण्यात आला. रस्ता नसल्याने वडगावपासून खौसावाडीपर्यंत कोणतेच वाहन जात नाही. त्यामुळे मृतदेह कसा न्यायचा, असा प्रश्न नातेवाईकांना पडला. त्यांनी चादरीची झोळी तयार केली आणि दगड-धोंडय़ांतून पाच किलोमीटर पायपीट करून मृतदेह घरापर्यंत नेला.
खौसाकाडी, काजुचीकाडी, केळीचीकाडी, तांबडी आणि उंबरमाळकाडी या पाचही आदिकासी काडय़ांच्या मूलभूत सुकिधांसाठी ग्राम संकर्धन सामाजिक संस्था पाठपुरावा करत आहे. या आदिकासी काडय़ांकरील रस्त्यांसाठी एका ठेकेदाराला 1 जानेकारी रोजी 7 कोटी 60 लाख रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. मात्र या गोष्टीला 10 महिने उलटून गेले तरी आजतागायत रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
खौसावाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता करावा याकरिता आदिवासींनी अनेकदा आंदोलने, मोर्चे काढले. मात्र प्रत्येक वेळी प्रशासनाने आश्वासनाचे गाजर दाखवले. त्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासींनी नुसत्या घोषणा नकोत, सरकारने कामेदेखील करावीत असे खडेबोल सुनावले आहेत.