मराठीला अभिजात दर्जासाठी झगडलो याचा अभिमान – अरविंद सावंत

मराठीला अभिजात दर्जासाठी झगडलो याचा अभिमान असल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत. मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत. आज गिरगाव येथील गुढीपाडव्याच्या भव्य मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

अरविंद सावंत म्हणाले आहेत की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात लोकसभेत सर्वाधिक भांडणारा आणि झगडणारा व्यक्ती मी आहे. मला त्याच अतिशय आनंद आहे. पण फक्त अभिजात भाषेचा दर्जा मिळून जमणार नाही. आपण अभिजन व्हायला पाहिजे, मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे.”