संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या सद्यपरिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले. अरविंद सावंत यांनी एमटीएनएलचे कर्मचारी चालवत असलेल्या पतपेढीतील पैशांवरून केलेल्या आरोपाने सरकारला चांगलीच चपराक बसली आहे. पतपेढीमधील चार कोटी रुपये सरकारने स्वखर्चासाठी वापरल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी लोकसभेत केला.
महानगर टेलिफोन निगमचे कर्मचारी चालवत असलेल्या पतपेढीमधील गेल्या सहा महिन्यांत चार करोड रुपये ह्या सरकारने स्वखर्चासाठी वापरले आहेत.
– अरविंद सावंत, खासदार@AGSawant pic.twitter.com/Y6kx8JcqJg
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 4, 2024
बीएसएनल आणि एमटीएनएलचा कारभार सुधारला असून आता उत्पन्नात वाढ होत आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, सत्ताधारी पक्षातील कितीजण एमटीएनएल आणि बीएसएनएलचे फोन वापरत आहेत, असा सवालही त्यांनी केला. आता या सेवांची आर्थिस स्थिती सुधारल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून सरकार कर्मचाऱ्यांच्या पतपेढीतील 4 कोटी रुपये वापरत आहे. महानगर टेलिफोन निगमचे कर्मचारी चालवत असलेल्या पतपेढीमधील 4 कोटी रुपये सरकार सहा महिन्यांपासून स्वखर्चासाठी वापरत आहे, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.