‘वक्फ’वरून शिवसेनेबद्दल भ्रम पसरवणे हे भाजपचे कारस्थान, अरविंद सावंत यांचा आरोप

‘वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून शिवसेनेबद्दल भ्रम पसरविण्याचे कारस्थान भाजप करीत आहे. मुळात ‘वक्फ’च्या मूळ कायद्याला शिवसेनेचा विरोध नाहीच, परंतु भाजप आणि केंद्र सरकार सुधारणांच्या नावाखाली सामाजिक धोरण न राबविता राजकारण करीत आहे,’ असा थेट आरोप शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी केला.

लोकांमध्ये भ्रम तयार करून तसेच हिंदू-मुस्लिम असा वाद तयार करून त्यांच्यात भांडणे लावण्याचे प्रयत्न भाजपचे आहेत. भाजप आणि मोदी सरकार स्वतःचे अपयश लपविण्यासाठी हा खटाटोप करीत आहेत, असे अरविंद सावंत म्हणाले.