
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर निकाल देताना कनिष्ठ न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या जामीनाला स्थगिती दिली होती. मात्र, आता या निर्णयाविरोधात दिल्लीतील 150 पेक्षा जास्त वकिलांनी आवाज उठवला असून केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती देण्याचा निर्णयाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून ही चिंता व्यक्त केली आहे.
केजरीवाल यांना कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. हा दिलेला निर्णयाबाबत चिंता वाटते, असे वकिलांनी म्हटले आहे. हा निकाल हितसंबंधांशी जोडलेला असल्याचे मत पत्रात व्यक्त केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर कुमार यांनी याप्रकरणाच्या सुनावणीपासून दूर राहायला हवे होते. कारण त्यांचे भाऊ तपास एजन्सीचे वकील आहेत. त्यामुळे केजरीवाल यांच्या जाामीनाबाबतच्या सुनावणीपासून त्यांनी दूर राहणे गरजेचे होते. त्यामुळे या निर्णयात हितसंबंध गुंतले असल्याची शक्यता वकिलांनी वर्तवली आहे. तसेच या निकालाबाबत चिंताही व्यक्त केली आहे.