दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मोठी घोषणा करत सांगितले होते की दोन दिवसांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडे टीव्हीने दिले आहे.
अरविंद केजरीवाल उद्या दुपारी साडेचार वाजता दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.