बोगस एक्झिट पोलमागेही मोदी-शहांचे कारस्थान – केजरीवाल

एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल असे दाखवण्यात आले आहे. पण या बोगस एक्झिट पोलमागेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कारस्थान असल्याची टीका आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सद्वारे केली आहे.

– मोदी-शहांच्या मित्रांनी शेअर बाजारामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. एक्झिट पोलनंतर बाजार सुरू होताच शेअर्सचे भाव वधारून त्यांना मोठी कमाई करता येईल.

– बहुमत भाजपच्या बाजूने आहे हे दाखवून निवडणूक अधिकाऱयांवर सहजगत्या दबाव आणून हेराफेरी करता येईल.

– राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोदी-शहा यांच्याविरोधात होणारी बंडखोरी रोखता येईल. केजरीवाल यांनी या शक्यता वर्तवतानाच मतमोजणीवेळी उपस्थित असणाऱया ‘इंडिया’ आघाडीच्या काऊंटिंग एजंटनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला.